esakal | चिमुकल्याचा गळा घोटणाऱ्या पित्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

crime

चिमुकल्याचा गळा घोटणाऱ्या पित्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : उचल घेतलेले पैसे बुडविण्यासाठी दहा महिन्याच्या चिमुकल्याचा गळा घोटणाऱ्या आरोपी पित्याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुढील सहा दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज (शुक्रवारी) दिले. आरोपी श्रावण बाळनाथ आहिरे (वय. ४०, रा. हिरेनगर, ता. नांदगाव, जि. नाशिक) या मेंढपाळ मजुराने मालक संतोष गोराणे यांच्याकडून घेतलेली अड्डीच लाख रुपयांची उचल घेतली होती.

मालकाकडुन घेतलेले पैसे बुडविण्यासाठी आरोपी पित्याने स्वतःचा दहा महिन्याचा मुलगा सोपान आहिरे याचा गळा घोटण्याचा धक्कादायक गुन्हा येथील एमआयडीसी परिसरात काल (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास घडला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेवून पहाणी केली होती. त्यानंतर श्वान पथक, ठशे तज्ञांचे पथक व फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरणीय तपासणी केली. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केली. पोलीसांनी आरोपीला आज सकाळी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. असता आरोपीला बुधवार (ता. ८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक समाधान सुरवडे यांनी दिली.

loading image
go to top