मागणीपेक्षा कमी खत उपलब्ध, राहुरीत होणार शेतकऱ्यांची धावपळ 

Fertilizer available less than demand in Rahuri
Fertilizer available less than demand in Rahuri
Updated on

राहुरी : तालुक्‍यात खरीप हंगामासाठी युरियाची 4500 टनांची मागणी आहे. प्रत्यक्षात, आजअखेर 900 टन युरिया उपलब्ध झाला आहे. युरियासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रात हेलपाटे मारत आहेत. युरियाची टंचाई लवकर दूर व्हावी. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

बाजरी, मका, तूर, मूग, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा, चारापिके, भाजीपाला बियाणांची 8 हजार 795 क्विंटलची मागणी आहे. पैकी 5 हजार 720 क्विंटल (65 टक्के) बियाणे उपलब्ध झाले आहे. 

सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज 

तालुक्‍यात खरीप हंगामाच्या मशागतींच्या कामाला वेग आला आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त (102 टक्के) पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. राहुरीच्या बाजारपेठेत कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. 

उसाचे पीक वाढणार

लॉकडाउनमुळे मागील दोन महिने नागरिक घरात अडकले होते. मात्र, शेतकऱ्यास कसली आलीय विश्रांती? मुळा धरणाच्या पाण्याचे यंदा चांगले नियोजन झाले. धरणाखालील मुळा नदीतील बंधारे भरले. उन्हाळी हंगामात सिंचनाचे उजव्या कालव्याद्वारे दोन, तर डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने मिळाली. बागायती भागात व नदीकाठची पाणीपातळी वाढली. त्यामुळे ऊस, कपाशी, मका, सोयाबीन पिकांच्या लागवडी जोरात आहेत. एप्रिल व मे महिन्यांत उसाची अडीच हजार हेक्‍टरवर लागवड झाली. 

29 हजार हेक्‍टरवर खरिपाची पिके होणार

तालुक्‍यात जिरायती 17 गावांचे 25 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. पैकी खरिपाचे सरासरी क्षेत्र 21 हजार हेक्‍टर आहे. यंदा, बाजरी आठ हजार हेक्‍टर, मका 4100, तूर 300, मूग 350, उडीद 25, भुईमूग 225, सोयाबीन 3700, कापूस 12 हजार, अशा 28 हजार 700 हेक्‍टरवर खरिपाची पिके होतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

दिवसाआड  200 टन युरियाचा पुरवठा

राहुरीत दिवसाआड 150 ते 200 टन युरियाचा पुरवठा सुरू आहे. सध्या युरियाची टंचाई आहे; परंतु 15 जूनपर्यंत ती दूर होईल. इतर रासायनिक खतांचा दोन हजार टन साठा शिल्लक आहे. खरिपासाठी 65 टक्के बियाणे बाजारात उपलब्ध आहे. काही बियाण्यांची टंचाई असली, तरी ती लवकरच दूर होईल. यंदा कपाशीचे अपेक्षित क्षेत्र कमी होऊन, उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. 
- महेंद्र ठोकळे, तालुका कृषी अधिकारी, राहुरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com