नगर जिल्ह्यात खताला मागणी घटली; रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन लाख टन खत 

दौलत झावरे
Tuesday, 22 December 2020

रब्बी हंगामातील पिकांसाठी खताची पावणे तीन लाख टन मागणी करण्यात आली होती.

अहमदनगर : रब्बी हंगामातील पिकांसाठी खताची पावणे तीन लाख टन मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सव्वा दोन लाख टन खताचे आवंटन मंजूर झालेली आहे. त्यापैकी एक लाख 65 हजार 905 टन खत उपलब्ध झाले असून त्यातील 34 हजार 521 टन खताची विक्री झाली आहे. सध्या एक लाख 31 हजार 384 टन खत शिल्लक आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची उपलब्धता लक्षात घेता कृषी विभागाने जिल्ह्यासाठी दोन लाख 78 हजार 985 टन खताची मागणी केली होती. त्यानुसार दोन लाख 23 हजार 510 टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. मंजूर आवंटनातून एक लाख 65 हजार 905 टन खत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील फक्त 34 हजार 521 टन खताची विक्री झाली आहे. सध्या जिल्ह्यात एक लाख 31 हजार 384 टन शिल्लक आहे. सध्या खताला मागणी कमी असल्यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवाकेंद्रांमध्ये खताची उपलब्धता दिसून येत आहे. 

काळाबाजार रोखण्यासाठी कृषी दक्ष 
शेतकऱ्यांना खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. खताचा काळाबाजार होऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरु आहे. 

शिल्लक खतांची आकडेवारी टनात 

युरिया ः 35472 
एमअओपी ः 8916 
एसएसपी ः 17146 
डीएपी ः 5420 
संयुक्त खते ः 64430 
एकूण शिल्लक ः 131384

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer demand declined in Nagar district