
अहिल्यानगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागाला बुधवारी व गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने उग्र रुप दाखविले. अनेकांच्या घरांचे पत्रे पतंगाप्रमाणे आकाशात भिरकले. जिल्ह्यात १५६ घरांची पडझड झाली. एकाचा मृत्यू, तर सुमारे एक हजार शेतकरी बाधित झाले आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली.