कोरोनाची नगरमध्ये कालही अन्‌ आजही फिप्टी ! 

Fifty in the city of Corona yesterday and today
Fifty in the city of Corona yesterday and today
Updated on

नगर ः कोरोनाची संख्या वेगाने वाढत असल्याने नगरमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयातून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार 56 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 963वर पोचली आहे. 
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 27 जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत 23 जण बाधित आढळले. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 303 झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयातील अहवालानुसार नगर शहरातील 25, नेवासे, संगमनेर येथील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सहा जण पाॅझिटिव्ह आढळले आहे. त्यात सर्जेपुरा तीन, पाइपलाइन राेड, विळद (नगर तालुका), पाथर्डी प्रत्येकी एक जण बाधित आढळला आहे.  कालही दिवसभर प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 63 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले हाेते.

आणखी 66 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग कायम असून त्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कधी नव्हे, ते नगरमध्ये तब्बल 66 जणांनी कोरोनावर विजय मिळवला. ही नगरवासियांसाठी खुशखबर आहे. यात संगमनेरमधील तब्बल 35 जणांचा समावेश आहे. याशिवाय नगर शहर 16, श्रीगोंदे पाच, जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी दोन, अकोले, बीड, शेवगाव, नगर तालुक्‍यातील प्रत्येकी एक जणाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 634 झाली आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com