esakal | धक्का लागल्याने दूध सांडले मग भांडणात रक्त सांडले
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

धक्का लागल्याने दूध सांडले मग भांडणात रक्त सांडले

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी ः शहरातील अजंठा चौकात शिरसाटवाडी व भिकनवाडा येथील युवकांत तुंबळ मारामारी झाली. यात दोन्ही गटांतील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही गटांतील 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी गणेश बाळासाहेब शिरसाट (रा. शिरसाटवाडी) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले आहे, की महादेव बाळासाहेब शिरसाट, नितीन नवनाथ शिरसाट, नवनाथ यशवंत शिरसाट (सर्व रा. शिरसाटवाडी) यांच्यासह आपण अजंठा चौकात दूधविक्री करीत होतो. त्यावेळी मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्का लागल्याने दूध सांडले.(Fighting between two groups in Pathardi taluka)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

त्याची विचारणा केल्याचा राग आल्याने त्याने फारुख रफिक शेख, लाला रफिक शेख, निजाम रफिक शेख, जुबेर फारुख शेख, छोट्या राजू पठाण, जुबेर शफिक आतार, मुन्ना शेख (मटणवाला), भय्या शेख, काल्या निजाम शेख, रंगनाथ गायकवाड, सोहेल पठाण, बब्बू रिक्षावाला, सूरज दहीवाले, आसिफ शेख व इतर 10 ते 12 जणांना बोलावून घेतले. या सर्वांनी तलवार, चाकू, लोखंडी गज, लाठ्या-काठ्यांनी आपणास व आपल्या सहकाऱ्यांना जबर मारहाण केली.

दुसरी फिर्याद अमीर ऊर्फ मुन्ना निजाम शेख याने दिली असून, गाडीचा धक्का लागल्याचा राग आल्याने गोकुळ शिरसाट, देवा शिरसाट, प्रवीण शिरसाट, गणेश शिरसाट, नितीन शिरसाट, संजय ऊर्फ हुंबल शिरसाट, महादेव शिरसाट, नवनाथ शिरसाट, रामा शिरसाट, राहुल शिरसाट यांच्यासह 10 ते 12 जणांनी आपणासह सहकारी तौफिक शेख, रंगनाथ गायकवाड, जुबेर शेख यांना तलवार, लोखंडी गज, लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच दंगलनियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात केल्या.

घटनेनंतर पोलिसांनी फारुख रफिक शेख, जुबेर शफिक आतार, भय्या शेख, कलंदर शेख, हमीद नजीर शेख या पाच जणांना अटक केली. त्यांना आज (ता. 26) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती सरपाते यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी आरोपींना 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पाचजणांना अटक

शहरातील मारामारी प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. दोन्ही गटांतील आठ जणांना नगर येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची माहिती काढली आहे. इतरांनाही लवकरच अटक केली जाईल.

- सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

(Fighting between two groups in Pathardi taluka)