esakal | संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर, तरी भांडणाचा जोर
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर तरी हाणामारीला जोर!

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः शहरातील अकोले नाका परिसरातील कोविड प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या क्षेत्रात किरकोळ कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना ( ता. 2 ) घडली. या वेळी प्राणघातक शस्त्रांचाही वापर झाल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दंगलीसह अन्य कलामान्वये सुमारे 25 जणांवर गुन्हा दाखल झाला असून शस्त्रास्त्र कायद्यान्वये एकाला अटक केली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी योगेश मनोहर सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्याचे वडील मयत आजीच्या दशक्रिया विधीचा फलक लावीत असल्याचा राग आल्याने अतुल सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, परिघा सूर्यवंशी, आकाश माळी, मेघनाथ सूर्यवंशी, विघ्नेश सूर्यवंशी, संपत सूर्यवंशी, उज्ज्वला सूर्यवंशी, मथुरा सूर्यवंशी, पूनम माळी, आदित्य सूर्यवंशी, मीना माळी, रुपा माळी, अनिता माळी व गणेश माळी या सोळा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन काठ्या, लोखंडी पाईप, लोखंडी कत्तीसह फिर्यादी, त्याचे वडिल मनोहर, आई अरुणा, भाऊ सचिन सूर्यवंशी अशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली.

तसेच फिर्यादीच्या घरावर दगड फेकून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीचे नुकसान केले. पोलिसांनी या सर्वांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन एकाला अटक केली आहे.

दुसरी तक्रार परिघा सहादू सूर्यवंशी यांनी दाखल केली आहे. त्यानुसार योगेश, सागर, सचिन, विनोद व उमेश मनोहर सूर्यवंशी, शिवानी सूर्यवंशी, शोभा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी व मनोहर सूर्यवंशी यांना आदित्य संपत सूर्यवंशी याने तुमच्या घरातील सर्व लोक कोविड संक्रमित आहेत. तुम्ही जास्त गर्दी करु नका असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी काठ्या घेवून फिर्यादी व फिर्यादीचे भाचे आदित्य व सिद्धेश यांना मारहाण करून पूनम माळी हिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण व दमबाजी केली. त्यानुसार या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

loading image