राहुरीत विवाहितेच्या छळाबद्दल गुन्हा दाखल

विलास कुलकर्णी
Monday, 14 December 2020

सासरी नांदत असताना माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

राहुरी: तालुक्‍यातील दोन विवाहितांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरी नांदत असताना माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मयुरी राहुल पाळंदे (वय 20, रा. राहुरी) हिने फिर्यादीत म्हटले आहे, की माहेरून साडेतीन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी सासरी छळ झाला. याप्रकरणी राहुल राजू पाळंदे (पती), संगीता राजू पाळंदे (सासू), राजू भास्कर पाळंदे (सासरे), रोहित राजू पाळंदे (दीर, सर्व रा. चेंबुर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या प्रकरणात मालती सोमनाथ गारे (रा. कणगर) हिने फिर्याद दिली. त्यानुसार, चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरी छळ होत होता. याप्रकरणी सोमनाथ सीताराम गारे (पती), सगुणा सीताराम गारे (सासू), सीताराम रामू गारे (सासरे, सर्व रा. खेड, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case of marital harassment in Rahuri