esakal | शिवरायांबद्दल अवमानास्पद वक्तव्य भोवलं; श्रीपाद छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

shripad chindam

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला बडतर्फ माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय ३५) याच्या विरोधात न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना दूरध्वनी करून वाद घातला होता, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्‌गार काढले होते. याबाबतची ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (filed-Chargesheet-against-Shripad-Chhindam-for-Controversial-statement-case-jpd93)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

छिंदम हा महापालिकेच्या उपमहापौर या शासकीय पदावर असल्याने भारतीय दंड संहिता कलम १९६ (१) (अ) प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी शनिवारी परवानगी दिल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी आज (सोमवारी) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ६० पानांच्या या दोषारोपपत्रात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

आवाजाच्या नमुन्याचाही समावेश

पोलिसांनी ऑडिओ क्‍लिपमधील आवाज आणि श्रीपाद छिंदम याच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आला असून, तोदेखील पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे.

छिंदम बंधूंच्या गुन्हेगारीचा वाढता आलेख

श्रीपाद व श्रीकांत छिंदम बंधूंवर गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात जमाव जमवून त्या माध्यमातून मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. दोघांवर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न अधुरेच; मायलेकींचा अंत

हेही वाचा: मांडवाच्या दारात कोरोनाचे विघ्न! तपासणीत आढळले ४३ बाधित

loading image