esakal | मांडवाच्या दारात कोरोनाचे विघ्न! तपासणीत आढळले ४३ बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

मांडवाच्या दारात कोरोनाचे विघ्न! तपासणीत आढळले ४३ बाधित

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर (जि. नगर) : जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पारनेर तालुक्यात आढळत आहेत. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील ७१ गावे संवेदनशील जाहीर केली. तसेच, लग्नसमारंभ व साखरपुड्याच्या कार्यक्रमात थेट जात कोरोना चाचण्या सुरू केल्या. काल (ता. १८) विविध विवाह सोहळ्यांत ४३ कोरोनाबाधित आढळून आले. (43 people tested positive for corona at wedding ceremony)


तालुक्यात काल मोठी लग्नतिथी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्नसमारंभांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाने थेट १३ ठिकाणच्या कार्यक्रमांत जात सुमारे तीन हजार सहाशे व्यक्तींची कोरोना चाचणी केली. त्यात ४३ व्यक्ती बाधित आढळल्या. त्यामुळे असे कार्यक्रम प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागले आहेत. तालुक्यात कोरोना नियम कडक करूनही रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. उलट, दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात पारनेर तालुका कोरोना हॉट स्पॉट बनला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, काल अनेक विवाह सोहळ्यांत रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे वाढला नगर जिल्ह्याचा टक्का; निकाल ९९.९७ टक्के


देवीभोयरे सात दिवस बंद

देवीभोयरे येथे आज १५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे गावातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापना सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

loading image