
सोलापूर/नवेगावबांध : नवेगावबांधची जगाला ओळख करून देणारे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या अस्थी त्यांचे गुरू माधवराव पाटील यांच्या समाधी शेजारी विसावणार आहेत. यासाठी त्यांचा अस्थिकलश तिथे पोचला असून, वनविभागाच्या रीतसर परवानगीची प्रक्रिया पूर्ण होताच हा विधी होणार आहे. समाधी बांधण्यात आल्यानंतर चितमपल्ली कुटुंबीयदेखील दर्शनासाठी जाणार आहेत.