
राशीन : आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या वडाच्या झाडाला त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाल्याची घटना गुरुवारी (ता.२४) दौंड -धाराशिव राज्यमार्गावर घडली. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेचे सदस्य संतोष शिंदे त्यांच्या खासगी कामानिमित्त सिद्धटेकला जात असताना त्यांना बारडगाव सुद्रिक ते भांबोरे दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या मोठ्या झाडाला आग लागलेली दिसली.