
संगमनेर : तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील महेश शांताराम शेटे या तरुणाच्या मेडिकल व हार्डवेअरच्या दुकानाला अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना सोमवारी (ता.१७) पहाटे घडली. या आगीत रोख रक्कम, औषधे, शेतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत शेटे यांचे मोठे नुकसान झाले आहे.