गुड न्यूज! सीना धरणात पहिल्यांदाच जुलैमध्ये ५१ टक्के पाणीसाठा

निलेश दिवटे
Tuesday, 14 July 2020

सीना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना गुड न्यूज असून स्थापनेपासून प्रथमच यंदा जुलैमध्ये सीना धरणातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा जास्त झाला आहे. मागील काही दिवसापासून सीना नदी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण 51 टक्यावर पोहोचले आहे.

कर्जत (अहमदनगर) : सीना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना गुड न्यूज असून स्थापनेपासून प्रथमच यंदा जुलैमध्ये सीना धरणातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा जास्त झाला आहे. मागील काही दिवसापासून सीना नदी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण 51 टक्यावर पोहोचले आहे.

सिना धरण निर्मीतीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच जुलैमध्ये पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरण निम्यावर भरले आहे. यामुळे येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा आणखीन पल्लवित झाल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्याची आवक चांगली आली आहे. तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सिना धरणाची पाणी साठवण क्षमता 2400 ...फू. असुन मृतसाठा 552 ...फू. तर गाळ 185 दलघफू आहे. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी सीना धरण पाणलोट क्षेत्राची परिस्थिती पाहता नुकत्याच सोडण्यात आलेल्या कुकडी आवर्तनातून मागील काही दिवसांपूर्वी कुकडी आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे अवघे दोन दिवस पाणी सोडण्यात आले होते. यावेळी धरणामध्ये अवघे 38 दलघफू पाण्याची आवक आली होती. आज मितिचा पाणीसाठा 1251 ...फू आहे. यापूर्वी सिना धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे. सिना धरण निम्यावर भरल्याने सिना लाभक्षेत्रातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मिरगजगाव येथील सीना प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात म्हणाले, तालुक्यातील मागील पावसाची आकडेवारी तपासली असता परतीच्या पावसानेच धरणात पाणी साठा आला आहे मात्र या वर्षी सुरुवातीला जुलै महिन्यातच धरण निम्मे भरल्याने चांगले संकेत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in July 51 percent water was stored in Sina Dam