
-हरिभाऊ दिघे
तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील पुष्पलता केशवराव दिघे यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुनर्वापर जलपालन प्रणालीद्वारे मत्स्यपालन प्रकल्प उभारला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करून पुनर्वापर जलपालन प्रणालीवर आधारित उभारलेला प्रकल्प जिल्ह्यातील पहिला मत्स्यपालन प्रकल्प ठरला.