जामखेड तालुक्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध 

वसंत सानप
Wednesday, 30 December 2020

जामखेड तालुक्‍यातील 49 पैकी पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. या गावांची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

जामखेड (अहमदनगर) : तालुक्‍यातील 49 पैकी पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. या गावांची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. 

तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आजअखेर 417 जागांसाठी 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यात सारोळा ग्रामपंचायतीची निवडणूक (नऊ जागांसाठी नऊ अर्ज) सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. खुर्द पैठण (सात अर्ज), आपटी (7), पोतेवाडी (7), अर्कीज (7) व याकी (9) या ग्रामपंचायतींसाठी जागांइतकेच अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. 

तालुक्‍यातील तीन निवडणुकांचा अंदाज घेतला असता, यंदा 49 ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज आले. सुरवातीच्या टप्प्यात निवडणुकीत उत्साह दिसत नव्हता. अर्ज दाखल करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे कमी अर्ज येतील, असे वाटत होते. मात्र, शेवटच्या दिवशी ऑपलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय झाल्याने अर्जांची संख्या वाढली. सायंकाळी उशिरापर्यंत तहसील कार्यालयात गर्दी होती. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Gram Panchayats in Jamkhed taluka unopposed