
संगमनेर ः पाच भावंडांचे सुखाने नांदणारे कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त करून टाकलं ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्याच्या (Sangamner Taluka) पूर्व भागातील ओझर बुद्रूक या गावात घडली. आईसह कुटूंबातील तीन मुलांना कोरोनाने गाठले. या घटनेमुळे ओझर बुद्रूक (Ozar budruk) गावावर शोककळा पसरली आहे.
संगमनेर तालुक्यातील अवघी दीड हजार लोकसंख्या असलेले ओझर बुद्रूक हे प्रवरा नदीकाठी आहे. तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. या लाटेत आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. बाधित झालेल्या अनेकांनी काही दिवस याकडे दुर्लक्ष करून स्थानिक पातळीवर उपचार घेतले. त्यामुळे आजार वाढत गेला.
(Five members of the same family died due to corona in Sangamner taluka)
कोरोनाचा (Corona Virus प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले. बहुतांश शेतकरी व दुग्धव्यवसायिक असलेल्या या छोट्याशा गावातही कोरोनाचा प्रवेश झाला. आणि सर्वसामान्यांचे जीवन अस्ताव्यस्त झाले. गावात नाक्यावरच शेळके कुटूंबीय राहते. कोरोनाचा फटका त्यांच्याच कुटुंबाला सर्वाधिक बसला.
शिवराम शेळके या दिवंगत सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबातील ते सदस्य होते. कुटूंबातील छबुबाई शिवराम शेळके ( 75 ) व त्यांची मुले अनिल ( 46 ), अॅड. सुधाकर ( 55 ) व शरद ( 40 ) यांचा कोरोनाने एकापाठोपाठ मृत्यू झाला. कोविडबाधेमुळे शिर्डी, श्रीरामपूर, नगर व संगमनेर येथे उपचार सुरू होते. परंतु शेवटी त्यांना मृत्यूने गाठलेच. या पैकी अनिल व शरद शेळके हे पास्टर म्हणून ख्रिस्ती धर्मप्रचार करीत होते.
गाव धावले मदतील
अचानक लागोपाठ पडलेल्या मृत्यूच्या छायेमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. सदस्यांना आपल्या निकटवर्तियांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. या काळात गावातील अर्जून हळनोर व ग्रामस्थांनी या कुटूंबाला मानसिक आधार दिला. त्यांच्या घरातील पाळीव जनावरांना चारा कापून आणणे, दुध काढणे आदी कामे युवकांनी स्वयंस्फूर्तीने करून शेळके परिवारातील सुनील व सुभाष यांना सावरण्याचे काम केले आहे.
(Five members of the same family died due to corona in Sangamner taluka)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.