esakal | आमदार नीलेश लंकेंचा औटींना धक्का, शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत
sakal

बोलून बातमी शोधा

Five Shiv Sena corporators in NCP

आमदार नीलेश लंके यांनी गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरात लक्ष घातले आहे.त्यांनी शिवसेना फोडाफोडीला पारनेर शहरातून सुरूवात केली

आमदार नीलेश लंकेंचा औटींना धक्का, शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर : शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई बोरुडे यांच्यासह शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे आज (ता. 4 ) प्रवेश झाला.

आमदार नीलेश लंके यांनी गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरात लक्ष घातले आहे.त्यांनी शिवसेना फोडाफोडीला पारनेर शहरातून सुरूवात केली. त्यामुळे  विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना हा मोठा धक्का आहे. 

हेही वाचा - नगरमधील एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची बाधा

सकाळीच कार्यकर्ते बारामतीकडे

आज आमदार लंके हे आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह बारामतीकडे रवाना झाले. नव्याने प्रवेश करणारे पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक  डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने तसेच शिवसेनेच्या महिला तालुका आघाडीप्रमुख उमाताई बोरूडे यांच्यासह माजी आमदार औटी यांच्यावर नाराज असलेले अनेक कार्यकर्ते होते.

यात उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे हे देखील होते. हे सर्व जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला.

यांनी केला प्रवेश

आमदार नीलेश लंके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्यासह नगरसेवक विजय वाघमारे, नगरसेवक पती दिनेश औटी, विलास सोबले, युवा नेते विजय औटी, पिंपळगाव रोठे येथील सरपंत अशोक घुले, डॉ. बाळासाहेब कावरे, सुभाष औटी यांच्यासह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आज सकाळीच बारामतीकडे रवाना झाला.

निवडणूक चार महिन्यांवर

नगर पंचायतीची निवडणूक अवघ्या चार महिन्यावर आली असताना शिवसेनेचे नगरसेवक फुटल्याने औटी यांना हा पारनेर शहरात मोठा धक्का बसला आहे.

आमदारांची पारनेरमध्ये जोरदार एंट्री

गेले अनेक दिवस नगरसेवकांमध्ये अस्वस्थता होती. या पूर्वी या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश थांबला होता. मात्र, आज आमदार लंके यांनी पाच नगरसेवकासह काही शिवसेनेचे कार्यकर्त्यांना फोडण्यात यश मिळविले. त्यामुळे आमदार लंके यांची पारनेर शहरात जोरदार एंट्री झाली आहे.

अौटींचा प्रतिडाव

नगर पंचायतीच्या निवडणुकीस अद्याप चार महिने बाकी आहेत. कदाचित निवडणुक पुढे ढकलली तर अाणखी वेळ मिळेल तोपर्यंत माजी आमदार औटी हे कोणता प्रतिडाव टाकतात, हे लवकरच कळेल.