esakal | पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळवून देऊ : खासदार विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Sujay Vikhe Patil

पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळवून देऊ : खासदार विखे पाटील

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


तिसगाव (जि. नगर) :
पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विखे कुटुंब पूरग्रस्तांबरोबर आहे. पूरग्रस्तांना केंद्र शासनाच्या योजनेतून मदत दिली जाईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी कोरडगाव येथे केले.


पाथर्डी शहर व तालुक्यातील कोरडगाव, मुखेकरवाडी, कोळसांगवी येथे खासदार डॉ. विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गोकुळ दौंड, डॉ. मृत्युंजय गर्जे, जि. प. सदस्य राहुल राजळे, अजय रक्ताटे, अनिल बोरुडे, बंडू बोरुडे, प्रतीक खेडकर, मंगल कोकाटे, पांडुरंग सोनटक्के, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्‍याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे उपस्थित होते. विखे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील, त्यातून पूरग्रस्तांसाठी काही भरीव मदत देता येईल का, त्यासाठी अधिकऱ्यांन सूचना केल्या आहेत

हेही वाचा: राज्यसरकारला सद्बुद्धी दे! राधाकृष्ण विखेंचे भगवतीला साकडे

loading image
go to top