esakal | राज्यसरकारला मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी दे! विखेंचे भगवतीला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

mla radhakrishna vikhe

राज्यसरकारला सद्बुद्धी दे! राधाकृष्ण विखेंचे भगवतीला साकडे

sakal_logo
By
सुहास वैद्य

कोल्हार (जि. नगर) : गेल्या दीड वर्षांपासून मधल्या काही काळाचा अपवाद वगळता कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने मंदिरावर अवलंबून असणार्‍यांची रोजीरोटी बंद आहे. कोरोनामुुळे अन्य घटकांना राज्यसरकारने मदत दिली. आता तर मदिरालयासह अन्य सर्वांना निर्बंधातून सुटका दिली असताना मंदिरे मात्र बंद ठेवली जात आहेत. राज्यातील महाआघाडी सरकारला संस्काराची व श्रद्धांची चिंता नाही. परंतु मद्यपान करणार्‍ंयाची चिंता आहे. अशा सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी साडेतीन साडेतीन शक्तिपीठांच्या भगवतीदेवीला घातले.


विखे पाटलांचा शिर्डी मतदारसंघ असलेल्या राहाता तालुक्यात कोल्हार, शिर्डीसह अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यांच्या मतदारसंघातील देवस्थानांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक येतअसायचे. सावळीविहीर फाट्यापासून कोल्हारपर्यंतच्या अनेक व्यावसायिकांचा रोजगार हा धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. संगमनेर रस्त्यावरील व्यावसायिकांची मदारही शिर्डीला येणार्‍या भाविकांवर आहे. शिर्डीसह ईतर भागातील व्यावसायिक गेल्या वर्षांपासून अडचणीत आहेत. हॉटेल, लॉज, हार फुले, प्रसादाच्या दुकानांसाठी केलेल्या गुंतवणुकीवरचे व्याजही निघत नाही. त्यातच कोरोनाची लाट आली. पहिल्या लाटेत मंदिरे बंद होती. केेंद्र सरकारनेच तसा आदेश दिल्याने आणि तो देशभर लागू असल्याने त्याविरोधात फारशी ओरड झाली नाही.
केंद्र सरकारने अगोदर निर्बंध मागे घेतले, तरीही राज्याने मंदिरे उघडली नाहीत. त्यामुळे नाराजी वाढत गेली.

शिर्डीचे व शनिशिंगणापूरचे तसेच या देवस्थानच्या मार्गावरील गावांचे अर्थकारण भाविकांवर अवलंबून आहे. राज्याने मंदिरे उशिरा उघडली. अन्य राज्यातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे उघडण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार काही मंदिरे किमान दोन दिवस तरी उघडावी लागली. दुसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्याने लगेच मंदिरे बंद केली. आता पाच महिने झाले, तरी मंदिरे बंदच आहेत. वेगवेगळ्या धार्मिक संस्थांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली. भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीने तर त्यासाठी मोहीम उघडली. दुसरी लाट ओसरून आता तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली, तरी मंदिरे उघडायला सरकार तयार नाही.

हेही वाचा: मोबाईलने घेतला बळी; अरणगावातील त्या खुनाचे रहस्य अखेर उलगडले


देशभरातील अन्य राज्यांत मंदिरे सुरू असताना राज्य सरकार मात्र कोरोनाचे कारण पुढे करून मंदिरे बंद ठेवत आहे. असा आरोप विखे पाटलांनी केला आहे. चौकट: उद्योगधंदे पूर्ववत होण्याची आशा:मदिरालयात व हॉटेलमधील गर्दी चालते ़आणि मंदिरात मात्र सामाजिक अंतर ठेवून होणारी गर्दी चालत नाही. या पार्श्‍वभूमीवर आमदार विखे यांनी राज्यसरकारला सदबुद्धी देण्याचे साकडे आदिशक्ती भगवतीदेवीला घातले.त्यांनी आवाज उठविल्यामुळे मंदिरावरील अवलंबिताना आपले उद्योगधंदे पूर्ववत होतील. व आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top