
राज्यातील पिठ व मसाला गिरणी चालकांना मराठीतून विज बिल द्या.
नेवासे (अहमदनगर) : राज्यातील पिठ व मसाला गिरणी चालकांना मराठीतून विज बिल द्या, वापरलेल्या युनिटपेक्षा स्थिर आकार, इंधन आकार, अधिभार, असे आवास्तव विज बिल देण्यात येवू नये, यासह विविध मागण्यांसाठी पीठ गिरणी चालकांनी घोडेगाव (ता. नेवासे) वीज वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
घोडेगांव येथील विज वितरण कंपणी कार्यालयाच्या प्रांगणात निरंतर सेवा पिठ गिरणी कामगार महासंघाचे राज्य प्रमुख प्रभाकर बागूल, सचिव अशोक सोनवणे, जिल्हाध्यक्ष अंबादास फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली पीठ व मसाला गिरणी चालकांनी धरणे आंदोलन करत वीज वितरणचे घोडेगाव उपविभागाचे उपअभियंता भाऊसाहेब बडे व नेवासे विभागाचे उपअभियंता शरद चेचर यांना निवेदन दिले.
निवेदनात विज वितरण कंपणीने पिठ गिरणी चालकांना मराठीतून विज बिल देण्याची मागणी करत इतर आकार गिरणी चालकांवर लादू नये, पिठ गिरणी चालकांनाही औद्योगिक वीज बिलानूसार आकारणी केली जाते. तर विद्यूत पुरवठाही २४ तास द्यावा. घरोघरी (मिनी गिरणी) चालक दळून देण्याचा धंदा करत असतील तर त्यांनाही व्यावसायिक दराने विज बिल आकारणी करण्यात यावी. या मागण्या करत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत विज बिल भरणा करणार नसल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे
आंदोलनात गोकूळ लोंढे, बाबासाहेब भूजबळ, रवि बोरुडे, रामनाथ दराडे, शिवाजी जाधव, लक्ष्मण पवार, बाळासाहेब वमन, रामभाऊ बोरुडे, अमोल दराडे आदी सहभागी होते.
संपादन : अशोक मुरुमकर