
विसापूर येथील खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने परप्रांतीय तरुणास अटक केली.
श्रीगोंदे (अहमदनगर) : विसापूर येथील लता मधुकर शिंदे (वय 56) यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने परप्रांतीय तरुणास अटक केली. मुकेश मोतीलाल गुप्ता (वय 28, मूळ रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. बेलवंडी) असे आरोपीचे नाव आहे. खुनाचे कारण समोर आलेले नाही.
याबाबत पोलिस निरीक्षक अरविंद माने म्हणाले, की विसापूर शिवारात 3 व 4 डिसेंबर रोजी लता शिंदे यांचा खून करून त्यांचा मृतदेह जवळच्या उसात टाकला होता. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र, घटनास्थळी पोलिसांना कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. रस्त्यालगतच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुकेश गुप्ता याला शोधून अटक केली.
संपादन : अशोक मुरुमकर