
यावेळी त्यांनी पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली, तसेच विविध विषयवार चर्चा करण्यात आली.
अकोले (अहमदनगर) : माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची तब्येत ठणठणीत असून, ते सध्या वरळी येथील निवासस्थानी आराम करीत आहेत. त्यांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरळी गाठले.
यावेळी त्यांनी पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली, तसेच विविध विषयवार चर्चा करण्यात आली. माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत ही भेट महत्त्वाची मानली जाते. नगर येथे माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक झाली. आमदार वैभव पिचडही उपस्थित होते. फडणवीस वरळी येथे एक तास होते.