

Former Mayor Accused of Exploiting Woman Under Pretext of Job Offer
Esakal
अहिल्यानगरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कळमकर याने तरुणीला नगर शहरासह पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. गुन्हा दाखल होताच कळमकर फरार झाला आहे.