

Prajakt Tanpure
sakal
पाथर्डी : हिंदुत्वाच्या नावावर मते घेऊन सत्ता मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळातच तिसगाव येथील कत्तलखान्यांच्या मुद्यावरून आदिनाथ महाराज शास्त्री व संतमहंतांना रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागते आहे. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी असून कत्तलखान्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना या प्रकरणी निलंबित करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.