esakal | बनावट डिझेल प्रकरणात मंत्र्यांचाच हस्तक्षेप; कर्डिलेंचा आरोप, ‘राहुरी कनेक्‍शन’वर बोट
sakal

बोलून बातमी शोधा

Former MLA Shivaji Kardile statement to Superintendent of Police Manoj Patil

बनावट डिझेल प्रकरणी कारवाई होऊनही मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणात मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याने, पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

बनावट डिझेल प्रकरणात मंत्र्यांचाच हस्तक्षेप; कर्डिलेंचा आरोप, ‘राहुरी कनेक्‍शन’वर बोट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात बनावट डिझेल प्रकरणी कारवाई होऊनही मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणात मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याने, पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या प्रकरणाचे "राहुरी कनेक्‍शन' असून, मुख्य सूत्रधार सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात कर्डिले यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात बनावट डिझेल प्रकरणी पोलिस कारवाई होऊन 15 दिवस झाले, तरी मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही. पूर्वीच्या नाप्था भेसळ प्रकरणाचा तपासही अजून पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे. या रॅकेटला मोठा राजकीय वरदहस्त असल्याने, खुलेआम बनावट डिझेलची विक्री केली जाते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व अन्य आरोपींना अटक झालेली नाही. राजकीय दबावापोटी कारवाईस विलंब होत असल्याचे दिसते. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून तत्काळ मुख्य सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली. अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, राजेंद्र उंडे, जब्बार पठाण, नयन शिंगे, अंकुश बरडे, सचिन म्हेत्रे आदी उपस्थित होते. 

विधानसभेत आवाज उठवू 
बनावट डिझेल प्रकरणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली. त्याचा योग्य तपास न झाल्यास, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून विधानसभेत आवाज उठविला जाईल. कारवाई करणाऱ्या पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. हे फक्त सत्ताधारी राजकीय पक्षच करू शकतो, असाही आरोप कर्डिले यांनी केला. 

ढुमे यांच्याकडून तपास काढला 
बनावट डिझेल प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढून श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविला आहे. राजकीय दबावाला बळी न पडता, डिझेल प्रकरणाचा नि:पक्ष तपास करून मुख्य सूत्रधाराला अटक करू, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image