पिचडांचा पलटवार ः चाळीस वर्षे पवारांसोबत होतो, तेव्हा नव्हतो का झारीतले शुक्राचार्य

Former MLA Vaibhav Pichad criticizes the opposition
Former MLA Vaibhav Pichad criticizes the opposition

अकोले : ""मागील चाळीस वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिलो. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी प्रदेशाध्यक्ष असताना पायाला भिंगरी लावून पक्षाचे काम केले. त्या वेळी झारीतील शुक्राचार्य नव्हते का,'' असा सवाल उपस्थित करून, ""कौटुंबिक कार्यक्रमात राजकीय भाष्य करणे, तसेच पिचड कुटुंबीयांना शिवीगाळ करणे, हे कोणत्या तत्त्वात बसते? यापुढे व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊन बंदोबस्त केला जाईल,'' असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून माजी आमदार वैभव पिचड यांनी अर्ज मागे घेतल्याने काहींनी त्यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केला. राजूर येथे एकत्र येत आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला. त्या वेळी पिचड बोलत होते.

या वेळी, पिचड हेच आमचा पक्ष असल्याचे सांगत, राज्यातील आदिवासी समाज त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहून भविष्यकाळात प्रत्येक निवडणुकीत एकीचे बळ दाखवून देईल, असे उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले. 

पिचड म्हणाले, ""मी भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश लढ्ढा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्रिपद देऊन सन्मान केला. या पदाचा उपयोग करून तळागाळातील आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचे काम करणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेत गेलो नाही, याचे मला मुळीच दुःख नाही. मात्र, वाईट प्रवृत्तीबाबत मनात सल आहे. त्याला उत्तर काळ व वेळच देईल. मात्र, तालुक्‍यातील प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, राहतील, यात तिळमात्र शंका नाही. त्यांना यापुढील काळात ताकद देण्याचे काम करू.'' 

आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सी. बी. भांगरे, चंद्रकांत गोंदके, विठ्ठल भवारी, सुनील सारोक्ते, भरत घाणे, सुरेश गभाले यांनीही भावना व्यक्त केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com