पारनेरमध्ये नेमकी कोणत्या नेत्याची दादागिरी आहे, औटींचा रोख कोणावर?

सनी सोनावळे
Friday, 22 January 2021

पोखरी (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील नूतन सदस्यांचा सत्कार औटी व जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील दादागिरीचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. काहीजण उघडपणे त्यावर भाष्य करतात. मात्र, काही आडून टोला मारतात. माजी आमदार विजय औटी यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचे काम केले आहे. नेमकी कोणत्या नेत्याची दादागिरी आहे.

'आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढायच्या आहेत. कोणाच्याही दादागिरीस किंवा दबावाला घाबरण्याची गरज नाही. विकासकामांच्या निधीसाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही,'' अशी ग्वाही विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी दिली. 

पोखरी (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील नूतन सदस्यांचा सत्कार औटी व जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

हेही वाचा - अण्णांच्या ड्रायव्हरची कमाल, जो तो म्हणतोय वा रे वा

रामदास भोसले, उद्योजक शिवाजी बेलकर, विकास रोहकले, हिराबाई पवार, सतीश पवार, संगीता शेलार, अनसूया मधे, सविता मधे, सीताराम केदार, अशोक खैरे आदी उपस्थित होते. 

दाते म्हणाले, ""निवडणूक संपली. आता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जांबूत रस्त्याचे लवकरच डांबरीकरण करणार आहोत.''

खडकवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी सरपंच सोपान फरतरे यांनी केले. सुभाष करंजेकर यांनी आभार मानले.

संपादन - अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Vijay Auti's criticism of Lanke