esakal | आमदार रोहित पवारांना माजी खासदार निलेश राणेंचे उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Former MP Nilesh Rane reply to MLA Rohit Pawar

सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माजी खासदार राणे यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली होती.

आमदार रोहित पवारांना माजी खासदार निलेश राणेंचे उत्तर

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माजी खासदार राणे यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली होती.

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत: ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले

होते.
 

माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करीत निलेश राणेजी लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत, असं निलेश राणे यांना सांगत ट्विटरवर शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी देखील मी आपला आभारी असल्याचे ट्विटद्वारे सांगितले. या मुळे या दोघांतील दिलजमाईची चर्चा सध्या जोरदार सुरू असून जावई बापू आणि आमदार यांचे अखेर जमलं असं म्हणीत टाळ्या घेऊ लागले आहेत.
 

संपादन : अशोक मुरुमकर