नुकसानग्रस्त डाळिंब बागांच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पात्र ठरलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई

विलास कुलकर्णी
Thursday, 17 December 2020

तनपुरे म्हणाले, स्कायमेट व केंद्र सरकार यांच्यातील करारानुसार राज्यात महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूलमंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारले आहेत.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यातील सर्व सात महसूल मंडळात फळपीक विमा प्रमाणके (ट्रीगर) नुसार भरपाईस पात्र ठरलेल्या नुकसानग्रस्त डाळिंब बागांच्या २९३ शेतकऱ्यांना एक कोटी ६० लाख ५३ हजार ८५५ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम येत्या आठ-दहा दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होईल. अशी माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली.

तनपुरे म्हणाले, स्कायमेट व केंद्र सरकार यांच्यातील करारानुसार राज्यात महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूलमंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारले आहेत. या स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तापमान, आर्द्रता व पर्जन्य नोंदीची दैनंदिन माहिती शासनाकडे पोहोचते. त्यानुसार विमा कंपनीला महसूल मंडळ निहाय नोंदी पाठविल्या जातात. विम्याचे ट्रिगर (प्रमाणके) नुसार तापमान, आर्द्रता व पर्जन्याच्या नोंदीचे निकष तपासून नुकसान भरपाई मिळवण्याची पात्रता ठरते. त्यामुळे यात मानवी हस्तक्षेप नसतो.

हे ही वाचा : श्रीरामपूर तालुकावार्ता : थत्ते मैदानाची दुरुस्ती करण्याची मागणी

फळपीक विम्याच्या नुकसान भरपाईची प्रतिहेक्‍टरी रक्कम विविध निकषानुसार मंजूर होते. त्यात, अवेळी पाऊस, ७० पेक्षा जास्त आर्द्रता, कमाल तापमान ४३ डिग्री सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग दोन दिवस आणि सलग तीन दिवस राहिले. एका दिवसात जूनमध्ये ४० व जुलैमध्ये ५५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस असे निकष आहेत. त्यानुसार ब्राह्मणी व वांबोरी (२४,२००), देवळाली प्रवरा (५४,५००), राहुरी बुद्रुक (१,०८,९५०), सात्रळ (६०,५००), ताहाराबाद (५४,४५०), टाकळीमिया (७८,६५०), राहुरी बुद्रुक (१,०८,९५०) महसूल मंडळ प्रतिहेक्‍टरी नुकसान भरपाईस पात्र ठरले.

महसूल मंडळ   शेतकरी संख्‍या   क्षेत्र (हेक्टर)    मिळणारी रक्कम 

*  ब्राह्मणी                   १४             १५.११            ३,६५,६६२
*  देवळाली प्रवरा        ८३             ५९.३७          ३२,३६,१६३
*  राहुरी बु.                ३८              ४५.५१          ४९,५८,३१५
*   सात्रळ                  ६०              ४१.३७          २५,०२,९५१
*   ताहाराबाद             ७१             ७७.६३         ४२,२७,४९७
*   टाकळीमिया            ३                ३.२४            २,५४,८२६
*   वांबोरी                  २४              २१.०१             ५,०८,४४२

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MP Prasad Tanpure informed that the farmers of the damaged pomegranate orchards will get compensation