मेंढपाळांचे पाल विद्युत रोषणाईने झळाळले; माजी सभापती झावरेंचा पालात मुक्काम

सनी सोनवळे
Sunday, 15 November 2020

मेंढपाळ म्हटले की, त्यांच्या नशिबी नेहमीची भटकंती.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : मेंढपाळ म्हटले की, त्यांच्या नशिबी नेहमीची भटकंती. मात्र, दिवाळीचा सण आणि कोणीतरी आपल्या पालात मुक्काम करण्यास येते. तेही सोबत फटाके, लाडु, करंजी घेऊन यामुळे पालातील ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला. पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी मेंढपाळ कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
झावरे यांनी पालामध्ये मुक्काम करून सोबत आणलेले दिवाळी फराळ प्रत्येक मेंढपाळास त्यांच्या मुलाबाळांना खाऊ घातले. त्यांच्या पालावर आकाशकंदील लावित रोषानाई केली. पालामध्ये आहे ती चटणी भाकरी खाऊन व आहे त्याच आंथरूणावर मुक्काम करत त्यांचे रोजचे जगणे अनुभवले. भटक्‍या असलेल्या या मेंढपाळांसाठी आयुष्यातील दिवाळीचा हा पहिलाच अनुभव होता. झावरे यांच्या साधेपणामुळे भाराऊन गेलेल्या मेंढपाळांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. पालातील सर्व मेंढपाळांनी झावरे यांच्या समवेत दिवाळी साजरी केली. माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्यापासून ढवळपूरी परिसरातील मेंढपाळ बांधवांशी झावरे कुटुंबाचा जवळची ओळख आहे. 

माजी सभापती झावरे म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो, त्यातील वंचित घटाकांपर्यंत पोहचून त्यांचे सुख दुःख समजून घेणे आपले कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतून मी थेट मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Speaker Rahul Jhaware stays with shepherds in Takli Dhokeshwar