कोरोनात आमदार संग्राम जगताप यांचे उल्लेखनीय काम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

कोरोना संकटात नागरिकांना धीर देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले.

अहमदनगर : कोरोना संकटात नागरिकांना धीर देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले. कोरोनाच्या काळात विविध गरीब कुटुंबांचा रोजगार गेला. त्यांना मदत करण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कवडे यांनी केले.
 
पुणे येथील अश्‍वमेध युवा मंचातर्फे कोरोना संकटामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांना गणेश कवडे व चाकणचे उपनगराध्यक्ष विजय मुटके यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अक्षय भोर, अश्विन भुरुक, भूषण गुंड, संतोष ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते. 

आमदार जगताप म्हणाले, 'नगर शहरातील जनतेने विश्‍वास टाकून मला महापौर व आमदारकीची संधी दिली. समाजाची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो. विकासकामांबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. कोरोना संकटाचा काळ मनुष्यजीवनाला वेदना देणारा ठरला. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Founder President Ganesh Kawade said that MLA Sangram Jagtap did the job of reassuring the people in the Corona crisis