esakal | नगरमध्ये चार कंटेन्मेंट झोन जाहीर

बोलून बातमी शोधा

Four containment zones declared in Ahmednagar

यात सिव्हील हाडको, आगरकरमळा, केडगाव गावठाण व नालेगावमधील अनुसयानगर परिसराताचा समावेश आहे. या ठिकाणी 23 एप्रिलपर्यंत कंटेन्मेंट झोन राहील. 

नगरमध्ये चार कंटेन्मेंट झोन जाहीर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरातील वाढती कोरोना रुग्णांची स्थिती पाहता महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी चार ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले. 

यात सिव्हील हाडको, आगरकरमळा, केडगाव गावठाण व नालेगावमधील अनुसयानगर परिसराताचा समावेश आहे. या ठिकाणी 23 एप्रिलपर्यंत कंटेन्मेंट झोन राहील. 

सिव्हील हाडको परिसरात उत्तरेस जैन धर्मस्थानकाजवळ माउली बंगला ते पुर्वेस लोहोकरे घर ते दक्षिणेस अतुल जनरल स्टोअर्स व पोस्ट कॉलनी, पश्‍चिमेस दारकुंडे यांचे मेडिकल दुकान हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन आहे.

आगरकर मळ्यातील विरंगुळा मैदान चौक ते सागर कॉम्प्लेक्‍स ते बेल्हेकर यांचे घर ते पश्‍चिम बाजूला डीपी रस्ता ते सोनाविहार बंगला ते पाटील घर ते अर्बन बॅंक कॉलनी आयकॉन पब्लिक स्कूल समोरील कोथंबिरे घर ते विरंगुळा मैदान चौक हा परिसर मायक्रो कंटेन्मेट झोन झाला आहे. केडगावच्या जुन्या गावठाण भागातील पूर्वेस हॉटेल अर्चना समोरील रेणुका ट्रेडर्स, केडगाव वेस, दक्षिणेस पुणे रस्त्यावरील जलाराम बेकर्स ते एडीसीसी बॅंक, पश्‍चिमेस माऊली मेडिकल ते अंबिका विद्यालय ते उत्तरेस नेप्ती रस्त्यापर्यंत हा परिसर तर नालेगावमधील अनुसयानगर आनंद पार्क ही वसाहत मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आली आहे.