नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांना गंडवले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

सोमनाथ सहादू पातकळ, माहेश्‍वरी ऊर्फ राणी सोमनाथ पातकळ (रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत योगेश भाऊसाहेब गुडघे (रा. बोल्हेगाव फाटा) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

नगर : आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बोल्हेगाव फाटा येथील एकाला चार लाख रुपयांना फसविल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

सोमनाथ सहादू पातकळ, माहेश्‍वरी ऊर्फ राणी सोमनाथ पातकळ (रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत योगेश भाऊसाहेब गुडघे (रा. बोल्हेगाव फाटा) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की भाचा सागर अण्णासाहेब घाडगे याला आरोपी सोमनाथ पातकळ याने, आरोग्य खात्यात नोकरीला लावून देतो असे सांगून विश्‍वास संपादन केला.

त्यास 2016 पासून वारंवार नोकरीचे आमिष दाखवून धनादेश व रोख, असे चार लाख रुपये घेतले. वारंवार पाठपुरावा केला; मात्र त्याने नोकरीला लावले नाही. पैशाची मागणी केली असता टाळाटाळ करू लागले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakhs cheated by showing job lure