
राहुरी : वांबोरी येथे कांदा व्यापाऱ्याला खंडणी मागणे, लुटण्याचा प्रयत्न प्रकरणी गुन्ह्यातील चार आरोपींच्या विरोधात राहुरी न्यायालयात दोषारोप सिद्ध झाले. न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांनी चारही आरोपींना खंडणीच्या गुन्ह्यात तीन वर्षे व कट रचून लुटण्याचा प्रयत्न प्रकरणी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.