नगर-दौंड महामार्गावर अपघातात चौघे वर्गमित्र ठार, लोणीव्यंकनाथ शिवारात झाला अपघात

संजय काटे
Wednesday, 9 December 2020

दरम्यान हे चौघेही वर्गमित्र असून त्यांची वय अठरा वर्षाच्या दरम्यान आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर ) : नगर-दौंड महामार्गावर लोणीव्यंकनाथ शिवारातील पवारवस्ती फाटा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भिषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले. हे चौघेही वर्गमित्र असल्याची माहिती असून मालट्रकच्या धडकेत हा अपघात झाला.

घटनास्थळी उपस्थितीत असणाऱ्या शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी 'सकाळ'ला दिलेल्या महितीनुसार, नगरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने या चौघांना उडविले. त्यात राजकुमार पवार १८, विशाल  सोनवणे, संजय  बरकडे हे तिघे जागीच ठार झाले तर प्रतीक नरसिंग शिंदे याला गंभीर जखमी अवस्थेत दौंडला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यालाही मयत घोषित करण्यात आले.

दरम्यान हे चौघेही वर्गमित्र असून त्यांची वय अठरा वर्षाच्या दरम्यान आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मदत कार्यात सहभाग घेतला. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four persons were killed on the spot in an accident at Pawarvasti Fata in Lonivanknath Shivara on Nagar Daund Highway