जीएसटीच्या नावाखाली व्यापाऱ्याला पावणेसहा कोटींना गंडवले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

माल न्हावाशेवा बंदरावर आल्यावर तेथील कस्टम ड्यूटी, जीएसटी व संशयित आरोपी यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी लोढा यांच्याकडून 27 कोटी 16 लाख 39 हजार 807 रुपये घेतले.

नगर : एमआयडीसील कंपनीला लागणारा कच्चा माला पदेशातून मागविला. तो माल नाव्हाशेवा बंदरावरून आणण्यासाठी कस्टम ड्यूटी, जीएसटीच्या नावाखाली जे.एम. ईडस्ट्रीज संचालक उद्योजक निखिलेंद्र मोतीलाल लोढा यांची सुमारे 5 कोटी 86 लाख 83 हजार 850 यांची फसवणूक झाली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात काल पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपी नवनाथ नारायण गोळे (रा. सुभाषनगर, खोपोली रायगड), लतादेवी यशवंत कांबळे (रा. नवी मुंबई), संतोशी कांबळे, दत्ता (पूर्ण नाव समजले नाही), निशा कुमकर (रा. बेलापूर, नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. या बाबत निखिलेद्र मोतीलाल लोढा (वय 52, रा. आनंदऋषी हॉस्पिटलजवळ माणिक नगर अहमदनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, संशयित आरोपी नवनाथ गोळे व लतादेवी कांबळे-गोळे हे ईशकृपा शिपिंग ऍन्ड लॉजिस्टिक्‍स प्रा. लि. खारघर नवी मुंबई या कंपनीचे संचालक आहेत.

हेही वाचा - मोहाची दारू स्कॉचपेक्षाही महाग

वरील आरोपींनी संगणमत करून कटकारस्थान केले. एक जुलै 2017 ते 15 मार्च 2019 या कालावधीत निखिलेंद्र लोढा यांच्या जे एम इंडस्ट्रीज कंपनीस लागणारा ऍल्युनियमचा कच्चा माल बाहेर देशातून (दुबई, मलेशीया, सिंगापूर) आयात केला आहे.

तो माल न्हावाशेवा बंदरावर आल्यावर तेथील कस्टम ड्यूटी, जीएसटी व संशयित आरोपी यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी लोढा यांच्याकडून 27 कोटी 16 लाख 39 हजार 807 रुपये घेतले. परंतु, वरील कालावधीमध्ये ऍल्युमिनीयमचे कच्चे मालास न्हावाशेवा बंदरावर कस्टम डयूटी, जीएसटी व आरोपी यांचे कामाचा मोबदला याची तपासणी शिपिंग कंपनीने 5 कोटी 86 लाख 83 हजार 850 रुपये जास्त घेतल्याचे लक्षात आले. लोढा यांनी आरोपींकडे जास्तीच्या रक्‍कमेची मागणी केली असता आरोपींनी ती देण्यास नकार दिला. 
...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of Rs 6 crore to a trader in the name of GST