राहुरीत दोन कैद्यांची "फ्री-स्टाईल' 

राहुरीत दोन कैद्यांची "फ्री-स्टाईल' 
राहुरीत दोन कैद्यांची "फ्री-स्टाईल' 
Updated on

राहुरी (अहमदनगर)  : राहुरीच्या कारागृहात सोमवारी रात्री साडेदहा वाजता दोन कैद्यांमध्ये बाचाबाची होऊन, फ्री स्टाइल मारामारी झाली. त्यात न्यायालयीन कोठडीतील एका आरोपीचे दोन दात पडले. चेहरा रक्तबंबाळ झाला. दुसऱ्या कैद्याच्या हाताला चावा घेतल्याने जखमा झाल्या. डॉक्‍टरांनी रात्री कारागृहातच दोन्ही कैद्यांवर औषधोपचार केले. याप्रकरणी मंगळवारी दुपारपर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. 

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील कारागृहात चार-पाच दिवसांपासून कैद्यांमध्ये धुसफूस चालू आहे. काल रात्री साडेदहा वाजता बरॅक नंबर तीनमधील दोन कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. भांडण विकोपाला गेले. फ्रीस्टाईल मारामारी सुरू झाली. दरोड्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीतील आरोपी महेश निमसे याने दुसऱ्या कैद्याच्या हाताला जोराचा चावा घेतला.

चिडलेल्या कैद्याने निमसे याच्या नाकावर व तोंडावर जोरदार ठोसे मारले. निमसे याचा घोळणा फुटला. दोन दात पडले. दाढी हलायला लागल्या. चेहरा रक्तबंबाळ झाला. तालुका दंडाधिकारी फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख तातडीने कारागृहात आले. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्‍टरांना बोलावून, रात्रीच दोन्ही कैद्यांवर कारागृहात औषधोपचार करण्यात आले. 

याच कारागृहात चार दिवसांपूर्वी शनिवारी (ता. 2) दुपारी साडेबारा वाजता न्यायालयीन कोठडीतील आरोपींना जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराच्या व्यक्तीने बरॅक नं. चारमधील कैद्यांना मिरचीच्या भुकटीचे पॅकेट पुरविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसताना, काल रात्री पुन्हा मारामारीचा प्रकार घडला. त्यावरही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. 

राहुरी कारागृहात सोमवारी रात्री कैद्यांमध्ये मारामारीचा प्रकार झाला नाही. किरकोळ बाचाबाची झाली. कैद्यांना मिरचीपूड पुरविण्याच्या प्रकरणाचा अहवाल तालुका दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. ते पुढील कारवाई करतील 
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, राहुरी 
 
सोमवारी रात्री राहुरी कारागृहात दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली. त्यात एकाचे दात पडले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक, राहुरी यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. मिरचीपूड प्रकरणी जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारास नोटीस काढली जाईल. 
- फसियोद्दीन शेख, तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, राहुरी 
 
सोमवारी रात्री राहुरी कारागृहातील दोन कैद्यांवर उपचार केले. एका कैद्याच्या हाताला चावा घेतला आहे. दुसऱ्या कैद्याचे दोन दात पडले असून दाढीचे दात हलायला लागले आहेत. त्याचा घोळणा फुटला होता. 
- डॉ. ऐश्वर्य रोकडे, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, राहुरी ग्रामीण रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com