ST buses : दोन कोटी ज्येष्ठांना मोफत प्रवास, तीन कोटी महिलांना पन्नास टक्के एसटी बसच्‍या सवलतीचा लाभ

ST buses : राज्य परिवहन महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची योजना आणि १२ वर्षांवरील महिलांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे, ज्यामुळे अनेक नागरिकांना सोयीस्कर प्रवास मिळत आहे.
free travel for senior citizens and women
free travel for senior citizens and womensakal
Updated on

अहमदनगर : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून, जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. १२ वर्षांवरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ जिल्ह्यातील ३ कोटी महिलांनी घेतला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देण्यात येते. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस. टी.च्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बससेवेसाठीदेखील लागू आहे. वातानुकूलित, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत लागू आहे.

महिलांची संख्या लक्षणीय

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. या घोषणेच्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून सर्व महिलांना ''महिला सन्मान योजने''अंतर्गत राज्याच्या हद्दीपर्यंत म्हणजेच राज्यांतर्गत धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे ३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असून, एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे.

हे पुरावे ग्राह्य

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com