Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Inspirational success story of Vikas Kale from Ahmednagar: तंबूच्या सावलीतून खाकीपर्यंतचा प्रवास; हलाखीच्या परिस्थितीत दिवसा मजुरी, रात्री अभ्यास आणि पहाटे घाटरस्त्यावर धावून विकास काळेचा पोलिस भरतीत विजय
Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream

sakal

Updated on

-राजू नरवडे

संगमनेर: घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची... रोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा... रात्री अभ्यास करायचा... आणि पहाटे उठून डोंगरदऱ्यांतील घाटरस्त्यावर तीन ते चार किलोमीटर धावायचे... राहण्यासाठी म्हणावे तसे घर नाही; मात्र या सर्व अडचणींवर मात करत तालुक्याच्या सतेचीवाडीचा विकास सीताराम काळे या जिद्दी युवकाने पोलिस भरतीत यश मिळविले. आपल्या स्वप्नाला गवसणी घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com