esakal | फरार बोगस डॉक्‍टरला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Fugitive bogus doctor arrested in Patoda

मुंगूसवाडे येथे बिश्‍वास (रा. बेराबेरिया, ता. आमडंगा, जि. उत्तर चोवीस परगणा, पश्‍चिम बंगाल) हा पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करीत होता.

फरार बोगस डॉक्‍टरला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातील मुंगूसवाडे येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पश्‍चिम बंगाल येथील बोगस डॉक्‍टर प्रोबीन बिरेश्‍वर बिश्‍वास याला पोलिसांनी बुधवारी पाटोदा (जि. बीड) येथून अटक केली.

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने मिनी लाॅकडाऊन मागे घेण्याची मागणी
 
मुंगूसवाडे येथे बिश्‍वास (रा. बेराबेरिया, ता. आमडंगा, जि. उत्तर चोवीस परगणा, पश्‍चिम बंगाल) हा पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करीत होता. तक्रारीवरून त्याच्या दवाखान्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे व त्यांच्या पथकाने 27 मार्च 2018 रोजी छापा घातला होता. मात्र, पथकाला पाहून बिश्‍वास मागच्या दरवाजातून पळून गेला. डॉ. दराडे यांनी त्याच्या दवाखान्यातून गोळ्या-औषधांचा साठा जप्त केला होता, तसेच पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
 
बिश्‍वास वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेत पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील संजय बडे, राजेंद्र केदार व रेवणनाथ रांजणे यांनी बुधवारी दुपारी कुसळंब (ता. पाटोदा, जि. बीड) येथे छापा घालून त्याला ताब्यात घेतले. तो तेथे नाव व गाव बदलून वास्तव्य करीत असल्याचे आढळले.
 

loading image