esakal | स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने मिनी लाॅकडाऊन मागे घेण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Swabhimani Maratha Federation has demanded to withdraw the mini lockdown.jpg

सोनईसह गणेशवाडी, श्रीरामवाडी, शिंगणापुर व इतर लहान मोठ्या गावात सक्तीने लहान व्यवसाय बंद करण्यात आले.

स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने मिनी लाॅकडाऊन मागे घेण्याची मागणी

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : जिल्हा प्रशासनाने कोवीड १९ महामारीच्या अनुषंगाने लागू केलेल्या मिनी लाॅकडाऊन मध्यमवर्गीय व गोरगरीबांच्या उपासमारीला कारणीभूत ठरत आहे. हा मोगलाई स्वरूपाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी व नेवासा तहसीलदार यांच्या नावाने तयार करण्यात आलेले निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष मनिषा सचीन निमसे व तालुका युवा अध्यक्ष निलेश बारहाते यांनी सोनईत कामगार तलाठी दिलीप जायभाय यांना दिले. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

सोनईसह गणेशवाडी, श्रीरामवाडी, शिंगणापुर व इतर लहान मोठ्या गावात सक्तीने लहान व्यवसाय बंद करण्यात आले. टपरी, हातगाड्या, मोटारसायकल दुरुस्ती, स्टेशनरी, लहान कापड दुकानदारसह इतर लहान उद्योग धंदे बंद केले. हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक संकटामुळे काही बरेवाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे निवेदनात नमूद केले आहे.

loading image