५६व्या वर्षी दिली परीक्षा, पीएसआय बनून केली स्वप्नपूर्ती

पीएसआय खंडीझोड
पीएसआय खंडीझोड

संगमनेर ः स्वप्नांना कधीही मरू द्यायचे नसते. स्वप्न ही नेहमी अशक्य कोटीतीलच पाहायची आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत धडपडायचं, असा सल्ला दिला जातो. त्यांच्यामागे धावत सुटल्यास कधी ना कधी ती घावतातच. साठ आणि त्याअलिकडील ५८ हे निवृ्त्तीचं वय समजलं जाते. अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी हिंमत हारली नाही. लहानपणी पाहिलेलं फौजदारकीचं स्वप्न पूर्ण झालं. (Fulfilled the dreams of PSI in the 56th year)

पीएसआय खंडीझोड
मराठा क्रांती मोर्चात जमलेल्या कोट्यवधी रूपयांचे काय झालं?

पर्यावरण क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात केलेल्या भरीव कामगिरीनंतर पोलीस दलात शिपाई म्हणून दाखल झालेल्या विजय खंडीझोड यांनी खात्यांतर्गत सरळ परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत केलेला प्रवास प्रेरणादायी आहे.

पदव्युत्तर शिक्षणानंतर 1986 ते 88 या काळात मुंबईतील कासा या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक वनिकरणाची जबाबदारी सांभाळली. या दरम्यान त्यांनी संगमनेरच्या बाळेश्वरच्या डोंगररांगात केलेले वृक्षारोपण आजही त्यांच्या कामाची साक्ष देते आहे. फौजदार होण्याच्या पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्तेतेसाठी कुटूंबात झालेल्या संस्काराची शिदोरी घेवून 1989 साली ते पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले.

आजवरच्या 33 वर्षांच्या सेवेत त्यांनी नगरच्या जिल्हा विशेष शाखा, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, संगमनेर शहर व तालुका अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी काम केले. गुन्हेगारांमधील गुन्हेगारी वृत्ती संपवण्यासाठी केलेल्या पोलिसींगमधून अनेकांना जीवनाचा चांगला मार्ग त्यांनी दाखवला. पूर्ण निर्व्यसनी असलेल्या खंडीझोड यांनी आयुष्यात कोणाच्याही डोळ्यात पाणी येवू देवू नकोस ही गुरुंची शिकवण जीवनात पदोपदी अंगीकारली.

कर्तव्यात कसूर हा शब्दही गावी नसलेल्या खंडीझोड यांचा उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आदींनी गौरव केला आहे.

आपल्या जीवनात अगदी लहानपणी ठरविलेले ध्येय साधण्यासाठी त्यांनी 2013 साली राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली आणि त्यात ते चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. त्यानंतर खात्यातंर्गत सरळसेवा परीक्षा देवून त्यात यश मिळवित त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक होवून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ते हजरही झाले आहेत. त्यांची ही यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादायी आहे.(Fulfilled the dreams of PSI in the 56th year)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com