सोनई गडाख बंधूंचीच आणि नेवासाही, सगळीकडे सोयीचे आरक्षण

Gadakh's convenient reservation at Nevasa
Gadakh's convenient reservation at Nevasa

नेवासे : नेवासे तालुक्‍यातील सर्व 114 ग्रामपंचायतींपैकी 54 राखीव, तर 60 खुल्या वर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यात तब्बल 58 ठिकाणी महिला राखीव आहे. यंदा प्रथमच निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण जाहीर होणार असल्याने सर्वांच्या नजरा सरपंच आरक्षणकडे लागल्या होत्या.

विशेषतः आजी-माजी आमदारांसह प्रमुख नेत्यांच्या गावाच्या सरपंच आरक्षणकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून होते. तालुक्‍यात सध्या 90 टक्के ग्रामपंचायतवर मंत्री शंकरराव गडाख गटाचीच सत्ता आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रशांत पाटील गडाख यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण होते. एकंदरीत दोन्ही बंधूंनी तालुक्यात आपला वचक कायम ठेवला आहे.

नेवासे येथील तहसीलच्या नव्या इमारतीत आज नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नागरिकांच्या उपस्थितीत ड्रॉ पद्धतीने सरपंचपदाचे आरक्षण काढले. दरम्यान 2020-25 या कालावधीसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सोनई व माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे कुकाणे सरपंचपद खुल्या (पुरुष) प्रवर्गासाठी, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे देवगाव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांचे शिरजगावचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी स्त्री राखीव झाले आहे.

माजी खासदार तुकाराम गडाख यांचे पानसवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्री राखीव झाले असून, गडाख यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गडाख येथे विद्यमान सरपंच आहे. 
आरक्षण, पुरुष व स्त्री राखीव गावे असे : अनुसूचित जमाती : गिडेगाव, दिघी, माळीचिंचोरा. स्त्री राखीव : गोधेगाव, रस्तापूर, गोगलगाव. 

अनुसूचित जाती : माका, खडके, खरवंडी, गोमावाडी, धनगरवाडी (सोनई), पानसवाडी, वाटापूर, सुलतानपूर. 
स्त्री राखीव : करजगाव, खामगाव, खेडले काजळी, जळके खुर्द, जैनपूर, पानेगाव, भालगाव, सुकळी बुद्रुक/खुर्द, हिंगोणी. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग : कौठा, गोपाळपूर, चांदे, जेऊर हैबती, पाचेगाव, पाथरवाला, रांजणगाव, रामडोह, वाकडी, शिरेगाव, सुरेगाव गंगा, सौंदळे, उस्थल दुमाला, बहिरवाडी. 
स्त्री राखीव : अंतरवाली, गणेशवाडी, तेलकुडगाव, देवगाव, नांदूर शिकारी, बाभूळ खेडे, मुकिंदपूर, लोहारवाडी, शिरसगाव, हंडीनिमगाव, मोरयाचिंचोरे, लांडेवाडी, गळनिंब, प्रवरासंगम, वांजोळी, सुरेशनगर. 

सर्वसाधारण : अमळनेर, उस्थळ खालसा, खणेगाव, खुपटी, खेडले परमानंद, घोगरगाव, जळके खुर्द, जायगुडे आखाडा, टोका, तरवडी, नाजिकचिंचोली, नेवासे बुद्रुक, बऱ्हाणपूर बेलपिंपळगाव, भानसहिवरे, मांडे, मोरगव्हान, लेकुरवाठी आखाडा, वंजारवाडी, वडाळा बहिरोबा, वरखेड, सोनई, कुकाणे, देडगाव, नारायणवाडी, निंभारी, भेंडे बुद्रुक, मंगळापूर. 
स्त्री राखीव : गेवराई, गोणेगाव, घोडेगाव, चिंचबन, चिलेखनवाडी, झापवाडी, तामसवाडी, देवसडे, नवीन चांदगाव, नागापूर, निपाणी निमगाव, पिंप्रीशहाली, पिचडगाव, मुरमे, बकुपिंपळगाव, बेलपांढरी, भेंडे खुर्द, फत्तेपुर, महालक्ष्मी हिवरे, म्हाळस पिंपळगाव, लोहगाव, शहापूर, शनी शिंगणापूर, कारेगाव, मक्तापूर, कांगोणी, गोंडेगाव, बेल्हेकरवाडी, राजेगाव, वडुले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com