अर्जमाघारीची मुदत संपल्यानंतर आज सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची, तसेच 591पैकी सुमारे 109 सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती नेवासे निवडणूक विभागाकडून देण्यात आली. अहमदनगर
नेवासे : तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्याच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या गावांसह एकूण 53 गावांत निवडणुकीचा फड रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नेवासे तालुक्यात युवा नेते प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने विकासासाठी घेतलेले दत्तक गाव मोरया चिंचोरेसह शनिशिंगणापूर, देवसडे, खरवंडी, मंगळापूर, वाटापूर या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, बिनविरोध निवड झालेल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व आहे.
दरम्यान, गडाख यांच्या सोनईत एकूण 17 जागांसाठी 42, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगाव येथे 13 जागांसाठी 29 उमेदवार उभे असून, या गावांसह एकूण 53 गावांत निवडणुकांचा फड रंगणार आहे.
अर्जमाघारीची मुदत संपल्यानंतर आज सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची, तसेच 591पैकी सुमारे 109 सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती नेवासे निवडणूक विभागाकडून देण्यात आली. अहमदनगर