esakal | गहिनीनाथांनी केली होती या डोंगरावर तपश्चर्या, म्हणून तेथे आहेत या औषधी वनस्पती
sakal

बोलून बातमी शोधा

Gahininath had done penance on this mountain, so there are these medicinal plants

या डोंगररांगेत अशा बहुगुणी वनस्पती सापडल्यामुळे नवनाथांचे वास्तव्य या भागात दीर्घकाळ होते. विविध वन्य पशू-पक्ष्यांचाही यामुळेच या डोंगरात वावर असतो. नवनाथांपैकी ॐ चैतन्य गहिनीनाथ महाराज यांनी घुमटवाडी येथील निसर्गरम्य परिसरात बारा वर्षे तपश्चर्या केली.

गहिनीनाथांनी केली होती या डोंगरावर तपश्चर्या, म्हणून तेथे आहेत या औषधी वनस्पती

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी ः घुमटवाडी हे गहिनीनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. गर्भगिरी पर्वतरांग हे औषधी वनस्पतींचे माहेरघरच आहे. दुर्मिळ वनौषधींचे ते मोठे आगार आहे. वेगवेगळ्या वनस्पतींनी नटलेले हे डोंगर नगर व बीड जिल्ह्यांचे भूषण आहेत. सर्व वनस्पतींचे ज्ञान नवनाथांना होते. त्याचा उपयोगही त्यांना माहिती होता. 

या डोंगररांगेत अशा बहुगुणी वनस्पती सापडल्यामुळे नवनाथांचे वास्तव्य या भागात दीर्घकाळ होते. विविध वन्य पशू-पक्ष्यांचाही यामुळेच या डोंगरात वावर असतो. नवनाथांपैकी ॐ चैतन्य गहिनीनाथ महाराज यांनी घुमटवाडी येथील निसर्गरम्य परिसरात बारा वर्षे तपश्चर्या केली. महाराजांनी तपश्चर्या केलेल्या ठिकाणीच मंदिरासमोर पिंपळ, आंबा, चिंच, उंबर महाकाय वृक्ष आजही साक्ष देत आहेत. या परिसरात पूर्वी प्रचंड झाडी होती, त्यामुळे जैवविविधता देखील मोठ्या प्रमाणात होती. 

हेही वाचा - खंडित विजेबाबत शोधला हा पर्याय

चैतन्य गहिनीनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेले ठिकाण असणा-या घुमटवाडी येथे दहा एकर क्षेत्रावर एक हजार देशी, वनऔषधी व जंगली झाडांचे रोपण केले. त्यांचे सवंर्धन करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविणा-या चैतन्य गहिनीनाथ वन उद्यान समितीने सात दिवस विविध संघटनांच्या माध्यमातुन वृक्षारोपन करून गणेश वृक्षमहोत्सवाचे आयोजन केले आहे. 
काळाच्या ओघात हे निसर्गसौंदर्य संपुष्टात येत आहे. सचिन चव्हाण व त्यांच्या सहका-यांनी मिळुन गणेश वृक्षमहोत्स 2020 चे आयोजन केले आहे. सर्पराज्ञी वन्यजीव पुर्नवसन केंद्र तागडगावचे सिद्धार्थ सोनवणे,सृष्टी सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून महोत्सावाला रविवारी प्रांरभ होणार आहे. लायन्स क्लब पाथर्डी, सुवर्णयुग तरुण मंडळ, पत्रकार संघटना पाथर्डी, सेवालाल-जगदंब भक्त मंडळ व वसंतराव नाईक वाचन मंदीर पाथर्डी,संजीवनी फौंडेशन, संघर्ष युवा प्रतिष्ठाण लांडकवाडी, मानवअधिकार संघटना अहमदनगर ह्या संस्था वृक्षारोपन करणार आहेत. 


वृक्षलागवड व संवर्धन करुन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही संघटीतपणे काम करीत अहोत. सामाजिक कामातुन मिळणारे आत्मिीक समाधान हेच आमचे मानधन आहे. लोक मदत करतात त्यांच्या माध्यमातुन हे काम उभ राहील. 
- सचिन चव्हाण, घुमटवाडी, पर्यावरणस्नेही संघटना पाथर्डी. 

संपादन - अशोक निंबाळकर