esakal | गांधी-राठोड संघर्ष नव्या वळणावर, विक्रम यांच्यासाठी सुवेंद्र यांची साखरपेरणी

बोलून बातमी शोधा

The Gandhi-Rathod conflict will end in the second generation}

उभयतांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी ते निवडणुकीत एक होत. त्यामुळे दोघांना शहरात भाजप आणि शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवता आली.

गांधी-राठोड संघर्ष नव्या वळणावर, विक्रम यांच्यासाठी सुवेंद्र यांची साखरपेरणी
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर : गेल्या काही वर्षांपासून नगर शहरातील राजकीय गणिते बदलली आहेत. शिवसेना आणि भाजप ही युतीत असताना माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार (कै.) यांच्या विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. खरे तर ते दोघेही हिंदुत्वासाठी लढत आले. नगर शहर युतीचा बालेकिल्ला होता.

उभयतांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी ते निवडणुकीत एक होत. त्यामुळे दोघांना शहरात भाजप आणि शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवता आली. महापालिका, विधानसभा आणि खासदारकी अशा सर्व पातळ्यांवर भाजप आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नामोहरम केलं.

हेही वाचा - सावरगावात जंगलात वणवा पेटला

काही बाबतीत दोघांमध्ये संघर्ष होता. परंतु नव्या पिढीत तो पाझरला नाही. आता माजी आमदार राठोड हे हयात नाहीत. त्यांचे चिरंजीव विक्रम हे सध्या कोणत्याच पदावर नाहीत. मागील महापालिका निडवणुकीत त्यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनाही महापालिकेत जाता आले नाही. मागील दोन निवडणुकीत पुलाखालून बरंच पाणी वाहिलं. ते सगळं विसरून गांधी-राठोड कुटुंब एकत्र येऊ पाहत आहे.

महापालिकेच्या प्रभाग नऊमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपने उमेदवार न देता राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांना बिनविरोध करावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना त्याबाबत पत्रही पाठवले आहे.

या पत्रात त्यांनी राठोड आणि गांधी कुटुंबात कसे ऋणानुबंध होते, याचाही उल्लेख केला आहे. दोघांतील समान मुद्दा म्हणजे हिंदुत्व, याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे. 

त्यामुळे प्रभाग नऊमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेही करणार आहे, असे सुवेंद्र गांधी यांनी म्हटले आहे. 

छिंदमच्या वार्डात पोटनिवडणूक

छत्रपती शिवरायांच्या अवमानप्रकरणी श्रीपाद छिंदम याला नगरसेवक पद सोडावे लागले होते. नंतर न्यायालयाने ते नगरसेवकपद रद्द केले. त्या प्रभागात सध्या निवडणूक होऊ घातली आहे. तेथे विक्रम राठोड इच्छुक आहेत. धनंजय जाधव यांचेही नाव चर्चेत आहे.