सावरगाव तळ येथे जंगलाला भीषण आग; 10 हेक्‍टर क्षेत्रावरील वनसंपदेचा ऱ्हास

The forest at Savargaon Tal caught fire on Wednesday night
The forest at Savargaon Tal caught fire on Wednesday night

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील सावरगाव तळ येथील जंगलाला बुधवारी रात्री आग लागली. यात दहा हेक्‍टर क्षेत्रावरील वनसंपदा जळाली. स्थानिक ग्रामस्थांनी वेळेत आग आटोक्‍यात आणल्याने हजारो एकर क्षेत्र वाचले.

पोलिस पाटलांविनाच चाललाय ७०० गावांचा कारभार
 
सावरगाव तळ येथे आठशे एकर वनक्षेत्र आहे. स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती विकसित झाली. विविध औषधी वनस्पती व वृक्षराजीसह जंगली प्राणी, पशू-पक्ष्यांचा या ठिकाणी मोठा वावर आहे. स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाने यासाठी सातत्याने प्रयत्न केले. बुधवारी (ता. तीन) रात्री साडेआठच्या सुमारास येथील डोंगर क्षेत्रावरील काही भागातील जंगलाला अचानक आग लागली. पाहता पाहता या वणव्याने उग्र रूप धारण केले.

गावातील अनेक तरुणांनी आगीची, वणव्याची माहिती पोलिस पाटील गोरक्ष नेहे आणि सरपंच दशरथ गाडे यांना कळविली. नेहे यांनी तातडीने वन विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना कळविले. दोनशे ते अडीचशे युवक वणवा विझविण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावले. वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, वनपाल रामदास डोंगरे, शेखर पाटोळे, वनरक्षक चैतन्य कासार, गजानन पवार, अरुण यादव, पुनाजी मेंगाळ, काशिनाथ दुधवडे यांचे पथकही घटनास्थळी मदतीसाठी पोचले. 

तहसीलदार अमोल निकम, पोलिस पाटील, वन विभागाचे अधिकारी वणवा विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. जवळपास दहा हेक्‍टरवरील वनसंपदा जळून गेली असली, तरी स्थानिक तरुणांमुळे उर्वरित वनसंपदा वाचविण्यात यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com