ST घडवते भाविकांना गणेशदर्शन

एसटी सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत अष्टविनायक दर्शनयात्रा १९९९ पासून सुरू
AST ganeshotsav 2022
AST ganeshotsav 2022sakal

राज्य : राज्य परिवहन महामंडळाने सुरवातीला प्रवासी सेवा देऊन सर्वांना आपलेसे केले. प्रवासी सेवेबरोबरच त्यांना देवदर्शन घडविण्यासाठीही एसटी नेहमीच प्रयत्न करीत असते. यामध्ये अष्टविनायक दर्शनयात्रा १९९९ पासून सुरू आहे. सध्या तारकपूर आगाराचे वाहक अमोल मैड हे या यात्रेचे काम पाहत आहेत. आता नव्याने जयदेव हेंद्रे हेही नियोजनात व्यग्र आहेत.

एसटी सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सर्वसामान्यांना देवदर्शन घडावे, यासाठी एसटीच्या अहमदनगर विभागातर्फे अष्टविनायक दर्शनयात्रा सुरू केली, ती आजही यशस्वीपणे सुरू आहे. हजारो जणांनी या यात्रेचा लाभ घेतला आहे. सुरवातीला ही यात्रा प्रासंगिक करारातून काढण्यात येत होती. आता तिला विशेष बससेवा असे नाव देण्यात आले आहे. या यात्रेत आता जिल्ह्यातील श्रीगोंदे, पारनेर, कोपरगाव, संगमनेर आदी आगारेही सहभागी होत आहे. मात्र, ती दिवाळी, उन्हाळा व गणपतीत सर्वाधिक भर देत आहे. तारकपूर आगारातून दर चतुर्थीसह दिवाळी, उन्हाळा, नाताळ, गणपती उत्सव, श्रावण महिन्यात सदैव योजना राबविली जात आहे. प्रवाशांची मागणी येताच अष्टविनायक यात्रेसाठी बसची व्यवस्था केली जात आहे. तारकपूर आगारातून वर्षात सुमारे २० वेळा अष्टविनायक यात्रा काढण्यात आली.

गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन तारकपूर आगारातून ऑनलाइन बुकिंगसाठी नोंदणी सुरू करण्यात येते. त्याची माहिती समाजमाध्यमांसह बसस्थानकातून केली जाते. ४४ भाविक यात्रेत सहभागी होताच बस यात्रेला मार्गस्थ होते.

अष्टविनायक यात्रेचा हा वारसा आपल्याकडे तत्कालीन वाहक रावसाहेब चौधरी यांच्यामुळे आला. चौधरी यांची वाहतूक नियंत्रक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर वरिष्ठांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे हे काम आनंदाने स्वीकारले, असे वाहक अमोल मैड सांगतात.करण्यात येते. त्याची माहिती समाजमाध्यमांसह बसस्थानकातून केली जाते. ४४ भाविक यात्रेत सहभागी होताच बस यात्रेला मार्गस्थ होते.

अष्टविनायक यात्रेचा हा वारसा आपल्याकडे तत्कालीन वाहक रावसाहेब चौधरी यांच्यामुळे आला. चौधरी यांची वाहतूक नियंत्रक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर वरिष्ठांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे हे काम आनंदाने स्वीकारले, असे वाहक अमोल मैड सांगतात.

उत्तम सुविधांसाठी...

जिल्ह्यातील देवस्थाने, राज्यपातळीची शक्तिस्थळे, पंढरपूर आदी ठिकाणी भाविकांना प्रवासासाठी एसटीने कायम चांगले उपक्रम राबविले आहेत. केवळ उत्पन्न मिळविणे हा उद्देश न ठेवता भाविकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी महामंडळ कायम प्रयत्नशील असते. तारकपूरच्या अष्टविनायक दर्शन यात्रेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे

तारकपूर आगाराने तेवढ्यावरच न थांबता तीन ज्योतिर्लिंग व दोन शक्तिपीठे- दक्षिण यात्रा, अकरा मारुती दर्शन, कोल्हापूर देवी दर्शन, भीमाशंकर दर्शन आदी यात्रा सुरू करून भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध केलेली आहे, असे आगारव्यवस्थापक अभिजित आघाव यांनी सांगितले.

अष्टविनायक यात्रा विशेष

  • पूर्ण तिकीट ः ११४५

  • अर्धे तिकीट ५७५

  • एकूण प्रवासी ः ४४

  • किलोमीटर ः ८००

  • यात्रेचा कालावधी ः २ दिवस

  • मुक्काम ः एक

  • उत्पन्न ः विनासवलत ४४ हजार

  • उत्पन्न ः सवलतीसह ५० हजार

- दौलत झावरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com