Ganeshotsav : गणेश लेखनविद्या

जगातील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास सांगतो, की माणसाने परस्पर सुसंवाद साधण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला
ganeshotsav
ganeshotsavsakal
Updated on

गणपती ही बुद्धीची देवता आहे. धर्मशास्त्रात तसे उल्लेख आहेत. तसेच ते ध्वनिशास्त्र किंवा उच्चारशास्त्र (Phonology), तसेच विशिष्ट लेखनप्रणालींच्या भाषांचा इतिहास, सांस्कृतिक ज्ञान, लेखनप्रणालीवरील समकालीन राजकीय प्रभावांचा अभ्यास (Scriptology) यांच्या आधारेही सांगता येते.

जगातील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास सांगतो, की माणसाने परस्पर सुसंवाद साधण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला. पैकी एक मार्ग लेखनकलेचा. माणसाची लेखन करण्याची कला किंवा पद्धतीच्या अभ्यासाला लेखनविद्या म्हणतात. भारतीय लेखनविद्येत पाश्चात्त्य; तसेच पं. सातवळेकर, पं. ओझा, य. रा. दाते, महादेवशास्त्री जोशी, अ. वा. वालावलकर, वाकणकर या भारतीयांनी काम केले आहे.

त्यांच्या मते, सम्राट अशोक यांच्या काळापूर्वी भारतात लेखनविद्या नव्हती, असा एक समज पाश्चात्त्य विद्वानांनी प्रचलित केला, पण संस्कृत, जैन व बौद्ध वाङ्मयाच्या आधारे भारतात लेखनकला फार पूर्वीपासून प्रचलित होती. पूर्व ब्राह्मी लिपीचे प्राचिनत्व आणि भारतीयत्व, तसेच सिंधू ब्राह्मी यांचे संबंध प्रस्थापित करण्याचे काम माहेश्वरी व गणेश लेखनविद्या यांच्या आधारे स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत.

ganeshotsav
Ganesh Chaturthi 2023 : उत्सव विवेकाचा

बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर ब्राह्मी लिपी आली आणि कालांतराने ती व्यवहारातून गेली. लिपीप्रमाणे ॐ कारचे रूपही बदलत गेले. ॐ कारचे अतिप्राचीन रूप अ + उ + ँ असे स्वरात्मक होते. नंतर अ + उ + मँ असे व्यंजनात्मक रूपांतर पौराणिक काळात झाले. या प्रतीकावरून गणपतीची मूर्तीची निर्मिती झाली असावी. सध्याचे हे रूप ॐ कारचे आडवे रूप असून मुळातील अवयव कायम राहिले आहेत. हा विषय आरेखनात्मक असल्यामुळे वालावलकर हे तीन चित्रे तयार करून त्याचे विवरण देतात. अ) प्रणव किंवा ॐ कराचे प्राचीन रूप, आ) यात स्वराला केवळ अनुनासिकाऐवजी ब्राह्मी मकार व तमीळप्रमाणे हलन्तासाठी अर्धमात्रारूप टिंब आहे, इ) आधुनिक ॐ कार आडवा झाला. यामध्ये मूळची सर्व रूपे तशीच आहेत.

ध्वनीच्या उच्चारण, लेखन व अवस्थांतरे यांच्या विषयक ही माहिती त्रोटक असली, तरी ती शास्त्रीय आहे. अशा या गणेशविद्येच्या आधारे गणपती आणि बुद्धीचे नाते सांगता येते.

ganeshotsav
Ahmednagar Crime : फळविक्रेत्याचा ग्राहकावर कोयत्याने हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com